HomeUncategorizedमुलींची छेडछाड करणाऱ्याला माफी नाही ; स.पो.नि.शंकर वाघमोडे

मुलींची छेडछाड करणाऱ्याला माफी नाही ; स.पो.नि.शंकर वाघमोडे

केज : मुलीच्या छेडछाडीच्या घटना वारंवार ऐकायला मिळतात परंतु आता पोलिस याबाबतीत जोरदार मोहिम हाती घेतली असून यासाठी पथक तयार करून रोडरोमीयोवर नजर ठेवली जाणार आहे.यासाठी शाळा व क्लासेस चालकांनी सहकार्य करावे व पालकांनी व मुलीनी पण बिनधास्त तक्रार करावी असे आवाहन केज पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वाना केले आहे . मुलीच्या छेडछाडीच्या घटना या क्लासेस व शाळेच्या अवती भोवती जास्त घडतात यात क्लासेसची वेळ ही सगळ्यात मोठी अडचणीची ठरते आहे यासाठी क्लासेस चालवणारांनी मुलींची बॕच सायंकाळी सातच्या आत संपवावी मुलांची वेळ उशीरा पर्यत ठेवली तरी हरकत नाही . क्लासेसच्या बाहेर सिसीटीव्ही बसवावेत तसेच क्लासेसच्या अवती भोवती असणाऱ्या दुकानदारांनी पण सिसीटीव्ही बसवावेत रस्त्यावर जवळपास सगळीकडे सिसीटिव्ही आहेतच . तसेच मुलीनी जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर बिनधास्त पोलिस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी .पालकांना पण जागरुक राहून त्रास देणाऱ्याची माहिती देऊन गुन्हे दाखल करावेत . छेडछाड करणारा कोणीही असो त्याला माफी मिळणार नाही असे आवाहन केज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी मुलींना , पालकांना व शिक्षकांना केले आहे . यासाठी पोलिस ,पत्रकार व जागरुक नागरिक यांची एक फळी उभा राहत आहे व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमीओंना आळा घातला जाईल असे सांगितले .मुलांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे आपले भविष्य उज्वल करावे असेही सांगितले आहे. केज तालुक्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकून जनजागृती पण केली जात आहे .शंकर वाघमोडे यांच्या ८८०१६४६४६४ या फोन वर फोन करून माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments