बीड : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील कानडी बदन येथे अवैद्य वाळू उपसा आणी अवैद्य वाळू साठ्याविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ८७ ब्रास वाळू चा साठा ताब्यात घेत एक ट्रॅक्टर ताब्यात घेतले असुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,कानडीबदन ता.केज येथे कांही इसमांनी आपले स्वतःचे फायद्या करिता नदीतून विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून त्याचा साठा करून ठेवला आहे.अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदरची माहिती त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार बालाजी दराडे, राजू वंजारे, मंडळअधिकारी भागवत पवार, तलाठी पटाईत यांना दिली.पंकज कुमावत यांचे पथक आणी महसूल विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पहाणी केली असता योगीराज पंढरी साखरे, अनिल भीमराव साखरे आणी अण्णासाहेब विष्णू जगदाळे यांनी कानडीबदन ता.केज यांनी अनाधिकृतरित्या नदी पात्रातून वाळू उपसा करून ठेवलेला साठ्यावर तीन ठिकाणी छापा मारून ८७ ब्रास वाळू जप्त केली.बृहस्पती रामकीसन नाईकवाडे यांनी त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच-४४/एस-३००२ हे अनधिकृतरित्या नदी पात्रातील वाळु भरून घेऊन जात असताना वाळूसह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.सदर वाहन तहसील कार्यालय केज येथे लावण्यात आले. तसेच मिळून आलेला वाळूसाठा व वाळूने भरलेले ट्रॅक्टर यांच्यावर पुढील कारवाई मंडळ अधिकारी पवार केज हे करीत आहेत.
