HomeUncategorizedदुर्देवी घटना, मुलानेच केला बापाचा कोयत्याने खून

दुर्देवी घटना, मुलानेच केला बापाचा कोयत्याने खून

केज : तालुक्यातील साळेगाव येथे पारखे यांच्या माळावर मांगवडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला कोयत्याने वार करून वडिलांचा खून करून प्रेत सोयाबीनच्या भुसकटात झाकून लपवून ठेवले. नंतर स्वतः जवळच्या पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची माहिती पोलीस अधिकाऱ्याना दिली. त्यामुळे खुनाचा प्रकार उघडकिस आला.दि. १४ जून मंगळवार दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे वय २६ वर्ष याने त्याचे वडील शिवाजी केशव हंकारे वय ५५ वर्ष यास जवळबन येथून मोटार सायकलवर बसवून साळेगाव येथील गावच्या दक्षिण दिशेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी पारखेचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या भागातील सदाशिव पारखे यांच्या गट नंबर २६५ मध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले. त्या नंतर पवन शिवाजी हंकारे हा त्याचे वडील शिवाजी हंकारे यास म्हणाला की, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारला. दुपारी २:३० ते ३:०० च्या दरम्यान दोघात बाचाबाची झाली. पवन हंकारे याने दारूच्या नशेत असलेल्या वडिल शिवाजी हंकारे यास अगोदर हाताने मारहाण केली. त्या नंतर कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. शिवाजी हंकारे हा दारूच्या नशेत असल्याने तो प्रतिकार करू शकला नाही. त्या नंतर पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे याच्या मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप एकून ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी केशव हंकारे वय ५५ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर मारेकरी मुलगा पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे याचे प्रेत तेथे असलेल्या सोयाबीनच्या भुसकटात कुणाला संशय येऊ नये म्हणून झाकून खून लपविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्याला वाटले की, प्रेताची अवहेलना होऊ नये किंवा प्रेत सडून किंवा कुत्र्यासारखे प्राणी प्रेत कुरतडल्यास खुनाला वाचा फुटेल आणी आरोप अंगावर येईल म्हणून पवन हंकारे याने दि.१५ जून बुधवार रोजी दुपारी २:०० च्या दरम्यान स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणी त्याने स्वतः वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांनी ही माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली.त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे घटना स्थळी हजर झाले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत संतोष गित्ते,अशोक नामदास,बाळासाहेब अहंकारे,सचिन अहंकारे, घोरपडे,महादेव बहिरवाळ,उमेश आघाव शेख चाँद, शेटे, भुंबे, यादव आदी पोलीस कर्मचारी हजर होते.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांची भेट दिली.

आरोपी मुलगा पवन शिवाजी हंकारे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments