केज – बीड रोडवर कोरेगाव जवळील लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलीला दिलेल्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.१५ जून बुधवार रोजी रात्री ९:०० च्या दरम्यान केज-बीड रस्त्यावर कोरेगाव जवळील लोकनेते गोपीनाथराव मुंडे सुतगिरणीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ एका अज्ञात वाहनाने मोटार सायकल क्र.एमएच-४४ व्ही-१८१० हिस जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवरील विनोद प्रकाश राऊत वय २६ वर्ष रा साळेगाव ता.केज आणी प्रेम धर्मराज मस्के राहणार महात्मा फुले नगर केज वय २४ वर्षे जखमी झाले आहेत. प्रेम मस्के या युवकास डोक्याला, तोंडाला मार लागला आहे. डावा हात फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक इंगोले आणि काळकुटे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.

