गोळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत व . गेवराई तालुक्यातीलदलित वस्ती सुधार योजनेत करोडो रुपयांचा झाला भ्रष्टाचार पप्पू गायकवाड देवराज कोळे
गेवराई : तालुक्यातील 137 ग्रामपंचायत मधील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम करून करोडोंचा भ्रष्टाचार केला आहे दलित वस्तीमध्ये काम न करता इतर ठिकाणी निधीचा खर्च केला आहे या दिवशी संबंधित अधिकारी व इंजिनियर ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर चौकशी समिती स्थापन करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर गेवराई येथे दि 15/6/2022 रोजी 11वा वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष अजय कुमार पप्पू गायकवाड यांच्यासह देवराज कोळे ,किशोर भोले ज्ञानेश्वर हवाले, किशोर चव्हाण, श्रीकृष्ण खेडकर रोहन गायकवाड, एकनाथ खाडे बाबासाहेब शरणांगत, सुरेश पोतदार, भिमराव महाराज, रयत संघटनेचे सुनिल भाऊ ठोसर आधी उपोषणास बसले असून न्याय मिळेपर्यंत उठणार नाही अशी प्रतिक्रिया अजयकुमार पप्पू गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे