अर्धापूर : ईस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध अर्धापूर पोलिसात गुन्हा दाखल करा , नुपूर शर्मा ला अटक करा या मागणी साठी आज दि.१० जून शुक्रवार रोजी शहरातील पदअधिकार कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.व शुक्रवार ची नमाज संपन्न झाल्या नंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. या वक्तव्यांचे गंभीर परिणाम आखाती देशात पाहायला मिळाले.त्यानंतर भारतात विविध ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.भारतीय जनता पार्टीने सुद्धा सर्व परिस्थिती पाहता पक्षाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांची हकालपट्टी केली आहे.मुस्लिम बांधवांनी निवेदनात केली आहै.नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी या करीता अर्धापूर शहरातील सर्व मुस्लिम बांधवानी. नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन काढून शांततेत पार पडले.शहरात ही सर्व मुस्लिम बांधवांनी आज दिनांक १० जून शुक्रवारी एकत्र येत नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला.नुपूर शर्मा वर कायदेशीर कारवाई करायची मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शहरातील पदअधिकारी.कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेषित मो.(सल.) यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा
RELATED ARTICLES