Homeबीड ग्रामीणवकीलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचा जामीन नामंजुर ; ॲड.अविनाश गंडले

वकीलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचा जामीन नामंजुर ; ॲड.अविनाश गंडले

बीड : प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की , दि . 16/05/2022 रोजी बीड येथील वकील हे त्यांच्या चुलत भावासोबत अम्ला वाहेगाव येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या मामाचा मुलगा उनवणे व गावातील रवी वक्ते ,बाळू देवडकर, महादेव चव्हाण यांच्यामध्ये आपसात भांडण चालु होते ते बीड येथील वकीलाने समजावून सांगुन मिटवले परंतु दि . 17/05/2022 रोजी वाहेगाव अम्ला येथील यात्रा संपन्न झाल्यानंतर वकील व त्यांचा चुलत भाऊ हे बीड कडे येत असतांना लोणी फाट्याजवळ आले असता पाठीमागुन चार जण मोटार सायकलवर बसुन आले त्यात रवी वक्ते , महादेव चव्हाण , बाळु देवडकर अविनाश वक्ते , सुनिल खराट , गोरक काळे व इतर दोन लोक यांनी गाडी आडवुन मोटार सायकलची चावी काढून घेतली व रवी वक्ते महादेव चव्हाण यांनी वकीलाच्या डोक्यात व अंगावर लोखंडी गजाने मारुन जखमी केले . वकिलाच्या डोक्यात गंभिर मार असतांना डोक्यास 14 टाके पडले असतांना हात फ्रॉक्चर झाले असतांना सिव्हिल हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी इंज्युरी प्रमाणपत्र साधे ( सिंपल ) दिले तसेच प्रकरणात तपासा मध्ये हाई घाई केली हा युक्तीवाद मा . 6 वे विशेष न्यायाधिश यांनी ग्राह्य धरला आहे . बीड येथील विधिज्ञ फिर्यादी यांनी आरोपी विरोधात कलम 307,143 , 147 , 148,149 भा.द.वी व कलम 3 ( 1 ) ( S ) 3 ( 2 ) ( 5 ) अनुसुचित जाती अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा नोंद केला यामधील आरोपी महादेव चव्हाण यास तपासी अधिकारी यांनी अटक केले होते . त्यानंतर महादेव चव्हाण याने न्यायालयात कि.फौ.अ.क्र .506 / 2022 दाखल केला होता . यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने ए . डी . राख व फिर्यादीच्या वतीने ॲड . अविनाश गंडले यांनी युक्तीवाद केला हा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा . विषेश जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड यांनी आरोपी महादेव चव्हाण यांचा जामीन नामंजुर केला . फिर्यादी तर्फे वकील पत्रावर बीड येथील विधिज्ञ प्रविण राख , ॲड . दत्ता डोईफोडे , व इतर विधीज्ञानी सह्या केल्या होत्या . आपला ॲड . अविनाश पं. गंडले , जिल्हा व सत्र न्यायालय बीड.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments