केज : अंबाजोगाई रोडवरील सोनीजवळा पाटीवर एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी आहे. सदरील घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली,केज पासून तीन किमी अंतरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकी नजीक सोनीजवळा पाटीवर सदर अपघात झाला आहे. दुचाकीवरील गंभीर जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु एकास मृत घोषित करण्यात आले आहे. सदरील अपघातातील मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान अपघातातील मोटारसायकल बळीराम घोलप नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास केज पोलिस करीत आहेत
बस आणी मोटार सायकलचा अपघात ; एकजण मृत्युमुखी
RELATED ARTICLES