HomeUncategorizedदारूच्या नशेत वडिलांना मारहाण ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दारूच्या नशेत वडिलांना मारहाण ; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

केज : वडील दारू पितात म्हणून मुलाने दारूच्या नशेत वडिलांना मारहाण केली. त्यामुळे जखमी वडिलांचा मृत्यू झाला असल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, युसुफवडगाव ता. केज येथे दि.१२ जून रविवार रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान मल्हारी निवृती लगसकर याने स्वतः दारू पिऊन त्याचे वडील निवृती कोंडिबा लगसकर वय ७० वर्ष यास ते दारू पितात म्हणून मारहाण केली. आणी टणक वस्तूने डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केली. या मारहानीमुळे त्याचे वडील निवृत्ती कोंडीबा लगसकर याचा मृत्यू झाला.मयताचा दुसरा मुलगा पोपट निवृत्ती लगसकर याच्या फिर्यादी वरून त्याचा भाउ मल्हारी निवृती लगसकर याचे विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/२०२२ भा.दं.वि. ३०४ नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख हे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments