बीड : माणुसकीला काळीमा फासलेल्या घटनेची फिर्यादी प्रमाणे हकीकत अशी की, रामपुरी ता. गेवराई येथे दिनांक ०४/०५/२०२२ रोजी फिर्यादी व तिचा पती व तीन मुलं रात्री ११ वाजता घरात झोपलेली असताना अचानक पत्र्यावर दगडे पडण्याचा आवाज आला होता म्हणून फिर्यादी व तीचा पती घराबाहेर बघण्यासाठी गेले असता बाहेर फिर्यादीस सुंदर तायडे हे दिसले. फिर्यादीचे पती त्यांना थांब थांब म्हणाले तर तो पळून गेला. त्यानंतर तिनं मुले घरात झोपलेली होती. त्यामुळे दरवाज्याला बाहेरून कडी लावून फिर्यादी व तिचा पती सुंदर तायड यांच्या घरी गेले, त्यावेळी त्यांच्या घरी तो नव्हता. त्यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर व भावजयी हे होते. त्यांना फिर्यादीने सुंदर कुठे आहे असे विचारले असता, त्यांनी तो घरी नाही असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने त्यांना झालेला प्रकार सांगितला व पुन्हा फिर्यादी घरी आले. व दार उघडले. त्यावेळी फिर्यादीची झोपलेली 6 सहा वर्षाची मुलगी हि घरामध्ये दिसली नाही. त्यावेळी बाहेर बघितले ती दिसून आली नाही. त्यानंतर गावात चिमुकलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही. जवळपास रात्री २.०० वा. सुमारास चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला त्यामुळे फिर्यादी व नातेवाईक आवाजाच्या दिशेने गेले असता ती चिमुकली गावातून लिंबाजी बाबांच्या मंदिराकडून रडत चालत येत होती. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांनी त्या चिमुकलीला विचारले असता तिने सांगितले की, घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. व अत्याचार केल्याचे जर कोणाला सांगितले तर तुला गंगामध्ये फेकीन अशी चिमुकलीला आरोपीने धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर फिर्यादीचे फिर्यादीवरून सी. आर. नं. ६८/ 2022 पोलीस स्टेशन तलवाडा येथे आरोपी नामे सुंदर तायड व विनोद शरणांगत यांच्याविरुद्ध कलम ४५२, ३३६, ३६३, ३७६(अ) (ब), ३६६(अ), ५०६, ३४ भा.दं.वी. ४,६, ८, १२,१७ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच आरोपीने वकीला मार्फत जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. त्याचा फौजदारी जामीन अर्ज क्र. ४४३/२०२२ असा आहे. त्या अर्जाला सरकार पक्ष तसेच जेष्ठ विधितज्ञ अॅड. तेजस सुभाष नेहरकर यांनी फिर्यादी तर्फे जामीन अर्जास आक्षेप दाखल केला होता. अॅड. तेजस नेहरकर यांचा लेखी युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांनी आरोपीचा जामीन अर्ज दिनांक ०७/०६/२०२२ रोजी नामंजूर केला आहे. या क्रूर घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण झाली होती, अशा नराधमास वेळोवेळी कठोर शिक्षा होणे गरजेचे असून त्या आरोपींना जामीन नामंजूर झाल्याने त्या चिमुकलीला न्याय मिळाला व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत अॅड. तेजस नेहरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणाकडे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचे लक्ष लागले होते.
चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीचा जामीन नामंजूर,नराधमांना कठोर शिक्षा करण्यासाठी माझे प्रयत्न ; ॲड.तेजस नेहरकर
RELATED ARTICLES