केज : तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून खत बियाण्याची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी या आशयाचे निवेदन गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केज तहसीलदार यांना दिले आहे.याविषयी सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यात ऐन पेरणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकडुन खत बियांची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची सर्रास लुट केली जात आहे.आणखी पेरणी सुरु झाली नाही तरी मार्केट मध्ये खत बीयान्यांची टंचाई हा विषय शेतकऱ्यांसाठी धक्का दायक असुन अश्या परिस्थीती मध्ये प्रशासन मुग गिळुन गप का ? सर्व सामांन्याना पडणारा हा प्रश्न आहे.तसेच दुकानदारास प्रथम दर्शनी स्टॉक बोर्ड लावने हे बंधनकारक असते परंतु याची आंमलबजावणी एकही दुकानदार करत नाही तरी व्यापाऱ्यांची मुजोरी थांबवून खतांच्या कृत्रिम तुटवड्या पासुन शेतकऱ्यांची सोडवणूक करावी,नसता संबंधीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतिने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व या अंदोलना दरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहिल असा खणखणीत इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने केज तहसीलदार यांना दिला आहे.या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक,अजीत धपाटे,महावीर पटेकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भिसे, राहुल सिरसट, राहुल पुरी, महेश कुपकर, ऋषिकेश कुपकर, अभिजित भिसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्यापाऱ्यांकडून खत बि-बियाणे यांची कृत्रिम टंचाई दाखवुन शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवा – कैलास चाळक
RELATED ARTICLES