केज : तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी असणाऱ्या गावरान आंब्याच्या सर्वोत्कृष्ट प्रजाती जपल्या जाव्यात याकरिता केज रोटरीच्या वतीने दरवर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या केज तालुका गावरान आंबे प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.प्रदर्शनात सतीश बजरंग नेहरकर,सोजर रामकिसन तपसे, चंद्रकला नेहरकर,रघुनाथ विठोबा आगे,महादेव आश्रुबा धपाटे,आशा रघुनाथ आगे,भागवत रतन चपाटे, शारदा वसंतराव गुंड,डॉ.उमाकांत मुंडे,अॕड.अनिता मुंडे, वृंदावणी खाडे,अंकुश धर्मराज गायकवाड, रामेश्वर मारोती घुले, सुनंदा दिनकर घुले,अक्षय वाघमारे व सुचिता रमाकांत डिकले यांनी भाग घेतला. या आंब्याचे परिक्षण,आंब्याची चव, गोडी व आकार या आधारे केले गेले. यामध्ये सुनंदा दिनकर घुले डोनगाव यांच्या गावरान आंब्याला प्रथम क्रमांक मिळाला. तर सुर्डी येथील शिवाजी हरिभाऊ ईखे यांच्या आंब्याला दुसरा तर शारदा वसंतराव गुंड यांच्या आंब्याने तिसरा क्रमांक मिळवला. भागवत रतन धपाटे व अॕड.अनिता मुंडे यांच्या गावरान आंब्याना प्रोत्साहन बक्षिसे दिली गेली.पारितोषिके मिळविलेल्या आंब्याच्या कोया प्राप्त करून त्यांची रोपे तयार करून लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रदर्शनात संकरीत प्रकारच्या केशर सह इतर कोणत्याही आंबा जातीला स्थान दिले नव्हते. या प्रदर्शनामुळे गावरान आंबे विक्रीला मोठा लाभ झाला.आंब्याचे परिक्षण विकास मिरगणे,दादा जमाले पाटील,प्रा.डॉ.बी. जे.हिरवे, भीमराव लोखंडे व अरुण नगरे यांनी केले. या प्रदर्शनाला नगराध्यक्षा सिताताई बनसोड, हारूणभाई इनामदार यांच्यासह अनेक नागरिकांनी भेट देऊन रोटरीच्या या महत्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष बापुराव सिंगण, सचिव अरुण अंजान, प्रोजेक्ट चेअरमन श्रीराम शेटे, श्रीराम देशमुख, यांच्यासह हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, महेश जाजू, दादा जमाले पाटील यांनी परिश्रम घेतले. रोटरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोटरी क्लब आॕफ केजच्या गावरान आंबा प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
RELATED ARTICLES