HomeUncategorizedकेज शहरात कळंब रोडवर अतिक्रमण प्रशासनाचे दुर्लक्ष...

केज शहरात कळंब रोडवर अतिक्रमण प्रशासनाचे दुर्लक्ष…

केज : शहरात अतिक्रमणात अधिक वाढ झाली आहे. वाहतूक कोंडी,पार्किंगची समस्या, अपघाताच्या घटना, तसेच शहरास आलेले बकाल स्वरूप, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. केज शहरात अनेक ठिकाणी व्यापाऱ्याने छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी मोठ-मोठे दुकाने (डब्बे) तयार केले आहे. तसेच शासकीय जागेत पण खुलेआम पत्र्याचे डब्बे उभा करण्यात आले आहेत याकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे,असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.प्रशासनाचे लक्ष नसल्याने केज शहरात अतिक्रमणात अधिक वाढ झाली आहे. शहरातील विशेषत: मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ परिसर व,मेन रोडबीड रोड, केज रोड, कळंब रोड जास्त प्रमाणात अतिक्रमण तसेच रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. एका भागातील दृश्य बघून अन्य भागातील व्यावसायिकांची हिंमत वाढली. त्यांनीही वाटेल त्याठिकाणी अनधिकृत व्यवसाय मांडून अतिक्रमण केले. व्यापाराच्या दुकानापासून ते रोड पर्यंत त्यांनी पूर्ण जागेवर कब्जा केला आहे.त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.यामुळे अपघाताचे प्रमाण केज शहरात वाढले आहे.यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे.शिवाय रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात अशा समस्यांनी डोके वर काढले आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर अतिक्रमण काढण्यासाठी नियोजन करावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments