HomeUncategorizedशंभर दिवसांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर, केज मध्ये विकासच करून दाखवणार - हारुण...

शंभर दिवसांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर, केज मध्ये विकासच करून दाखवणार – हारुण भाई इनामदार

केज : नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आणी, केजच्या नगरपंचायतीने विकास करण्याचा विडा हाती घेतला आहे. पाहता-पाहता शंभर दिवस होऊन गेले, केज मध्ये अनेक भागात नाली,पाणी व कचरा, नागरिकांच्या समस्या होत्या.तसेच नगराध्यक्षा सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारूनभाई इनामदार यांची सर्व टीम सर्व वार्डात कामाला लागली आहे. घंटागाडी,पाणी व विजेचा प्रश्न नागरिकांना पडला होता.तसेच नगराध्यक्षा सिताताई बनसोड, जनविकास परिवलन आघाडीचे सर्वेसर्वा हारूनभाई इनामदार यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचा प्रश्न मार्गी लावला, नागरिकांना व सर्व वार्डात त्यांनी जनतेला शब्द दिला आहे की, येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला आर ओ फिल्टर पाणी. सार्वजनिक ठिकाणी मोठ-मोठे डस्टबीन बसवण्यात येणार आहेत, आठवड्यातून दोन- तीन वेळेस नाली स्वच्छ केली जाते.आता नागरिकांना मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्षा सिताताई बनसोड,जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारूनभाई इनामदार केज नगरपंचायतच्या माध्यमातून वार्ड भागामध्ये छोटे-मोठे पार्क गार्डन लहान मुलांसाठी, खेळण्यासाठी जागा असो की धार्मिक स्थळ या ठिकाणीं विविध प्रकारच्या योजना उपलब्ध होणार आहेत. तसेच सभागृह, स्मशानभूमी,कबरस्थान व इतर कामे पूर्ण करणार आहेत.आपल्या केज शहरात धार्मिक स्थळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयभवानी चौक, भगवान बाबा चौक, डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौक,व इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.केज शहर होतआहे स्वच्छ शहरांमध्ये रोज दोन वार्ड या प्रमाणे स्वच्छता मोहीम चालू आहे पावसाच्या अगोदर मोठ्या छोट्या नाल्या रस्ते नगरपंचायतीने घेतले हाती.केज शहरातील मंगळवार पेठ,दर्गा रस्ता व फुलेनगर मुख्य रस्त्यांची पाहाणी व मोजमाप करण्यातआले.अतिक्रमण झालेल्या ठिकाणे संबधित घर,दुकान मालकांच्या निदर्शनात आणून देण्यात आली.नगरपंचायत केज राबवत असलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्यात आली आहे. केज नगरीची जनता आनंद वक्त करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा केज मध्ये भव्य पुतळा उभा राहावा म्हणुन जो केज नगर पंचायत मध्ये ठराव घेतला आहे व लवकरच काम चालू होईल. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे सभागृहाचे पण लवकरच काम चालू होणार आहे.केजमध्ये विकासाची शंभर दिवस सुसाट-शंभर दिवसात केलेल्या कामाचे कौतुक केजची जनता करत आहे.केज नगरपंचायतच्या निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडीने एक भूमिका घेउन निवडणूक लढवली विकास हेच धोरण आणी जनसामान्यांच्या कल्याणाचे या तोरण बांधुन केज शहराचा विकास करण्याचा संकल्प केला. गेल्या शंभर दिवसाचा टप्पा पार पडला असून या शंभर दिवसामध्ये प्रामाणिक पणे काम करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्वांनी प्रयत्न केला आहे. शंभर दिवसांमध्ये नियमिंत स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे,तसेच स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा दोन पाऊल पुढे टाकले असून शंभर दिवसाचा कामकाजाचा लेखाजोखा घेतला तर शंभर दिवसांमध्ये केजकरांनी आमच्या पाठीवर थाप मारण्याची नक्कीच चांगली कामे मी केली.समाजकारणातून राजकारणासह शहराच्या विकासात योगदान केज शहरातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हारुणभाई यांना समाजसेवेची विद्यार्थीदशेपासून आवड असल्याने आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगत हारुण इनामदार यांनी समाजकारण व राजकारणाची सांगड घातली. केजच्या विकासासाठी दोन दशकांपासून त्यांनी योगदान दिलेले आहे.शिक्षणाची गंगा आणून उद्याचे भविष्य घडविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.आपल्या अष्टपैलू कार्यातून केजकरांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments