केज : येथील शिकलकरी समाजातील एकाच कुटुंबातील मागील कांही दिवसापूर्वी झालेल्या भयानक अपघातात जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रा हादरला होता ,केज येथील गोके कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला होता ,या परिवारातील आठ व्यक्ती दगावल्या होत्या संपूर्ण कुटुंब उघडयावर पडले असून अशा दुःखाच्या वेळी गोरगरिबांचा आधार म्हणून ओळखले जाणारे निस्वार्थी व्यक्तिमत्व हारूणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी गोके कुटुंबास सांत्वनपर भेट देवून सांत्वन केले . केज येथील शिकलकरी समाजातील लहान मोठे असे एकुन आठ जण होळ येथे झालेल्या अपघातामध्ये मृत पावलेले होते. संपूर्ण कुटूंबावर शोककळा पसरली आहे अशा गोके कुटुंबातील व्यक्ती चे सांत्वन करुन माणुसकीचा आधार देत गोके कुटुंबाच्या दुःखात सामील होवून त्यांना आधार दिला.केज येथील हारुणभाई ईनामदार व नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी गोके परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी विनायक ठोंबरे ,सुशिल सत्वधर हे उपस्थित होते अपघातग्रस्त गोके कुटुंबीयांमध्ये एकुलती एक राहिलेल्या लहान मुलीचे पुढील संगोपन व शैक्षणिक खर्चाची पूर्ण जिम्मेदारी हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी घेतली आहे.लहान बालिकेची ही जिम्मेदारी घेऊन समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे . केज येथील संघर्ष पञकार संघानेही मदतीचा हात म्हणुन किराणा व भाजीपाला दिला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अश्रु तराळले होते . गोके कुटुंबावर झालेल्या आघातावर सर्वांनी मदत करावी असे आवाहन संघर्ष पञकार संघाचे अध्यक्ष आनिलराव गलांडे यांनी केले आहे.
संघर्ष पञकार संघाच्या आवाहनाला हारुणभाई ईनामदार यांचा प्रतिसाद
RELATED ARTICLES