HomeUncategorizedदुचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नविन मालिका सुरु.!

दुचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नविन मालिका सुरु.!

बीड : परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका MHBE हि सद्यस्थितीत सुरु असून, सदर मालिकेतील नोंदणी क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी MH23BF0001 ते 9999 ही मालिका दि. 08 जून 2022 पासून सुरु करण्यात येणार असून सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांनी केले आहे. ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यायचा आहे. त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेल्या फीच्या रकमेचा धनादेश व आपल्या ओळखपत्राच्या साक्षांकीत प्रतीसह 8 जून 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत परिवहनेत्तर शाखेमध्ये खिडकी क्रमांक 01 वर जमा करावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांच्या नावाचा सदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांनी दुसऱ्या कामाच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये मुळ शुल्का व्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश जमा केल्यानंतर लिलावाची विहीत कार्यपध्दती अवलंबून नोंदणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments