गेवराई : लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसली तरी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणि सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत आणि सुरू आहेत, मात्र ज्यांच्यावर मतदारसंघाने विश्वास टाकला, जबाबदारी टाकली, ते मात्र मतदारांना तोंड दाखवायला तयार नाहीत. विरोधासाठी विरोध म्हणून खोटेनाटे आरोप करण्याचा सपाटा विरोधकांनी लावला आहे त्यांना थारा देऊ नका असे प्रतिपादन जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गोंडगाव येथे तीस लक्ष रुपय किंमतीच्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीस लक्ष रुपये किमतीच्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, दत्ता संत, बप्पासाहेब सोलाट, नाना घाटुळ, सुनिल देशमुख, दत्ता सोलाट, राजेंद्र सोलाट, अमन सोलाट, वसंत पवार, शामराव पवार, मुन्ना गायके कृष्णा राठोड, बळीराम जाधव, पवन राठोड, शेख हमीद, ताराचंद राठोड, माणिक राठोड, बबन गांडुळे, कल्याण सोलाट, छगन सोलाने, अशोक सोलाट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये विकास कामे केली जात आहेत. सत्ता असो नसो लोकांच्या सदैव संपर्कात राहिले पाहिजे हे शिवछत्र परिवाराचे संस्कार आहेत. शिवछत्र परिवाराकडे प्रतिनिधीत्व नाही, कुठलेही विशेष पद नाही, मात्र लोकांचे आशिर्वाद आणि पाठबळ आहे. त्यामुळे लोकांना आधार आणि दिलासा देण्याचे काम आपण करत आहोत. ज्यांच्यावर मतदारसंघाने विश्वास टाकला ते मात्र विकासकामांसाठी घराबाहेर पडायला तयार नाहीत. ते लोकांच्या कामासाठी किती वेळा इथे आले हा संशोधनाचा भाग आहे अशी खरमरीत टिका त्यांनी यावेळी केली. एक महिन्याच्या आत डोंगरगाव येथिल या पुलाचे काम चांगल्या आणि दर्जेदार पद्धतीने केले जाईल असे सांगून ग्रामस्थांनी हे काम दर्जेदार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळामध्ये निवडणूकांची संधी साधून विरोधक तुमच्या कडे येतील, नाटके करतील, मात्र आपण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, त्यांना थारा न देता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना आशिर्वाद द्या असेही ते यावेळी म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधीत्व मिळाले नाही तरी लोकांसाठी काम करत आहोत ; विजयसिंह पंडित..!
RELATED ARTICLES