HomeUncategorizedएकाच कुटुंबातील अपघातात पाच जण गेले तरी लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार, पालकमंत्र्यांना भेट द्यायला...

एकाच कुटुंबातील अपघातात पाच जण गेले तरी लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार, पालकमंत्र्यांना भेट द्यायला वेळ मिळेना….

केज : स्वतःचे वडील वारले म्हणून अंबाजोगाई येथून आपल्या केज या गावी राख सावडण्यासाठी येऊन आणी राख सावडुन आपल्या राहत्या घरी जात असताना होळ येथील सबस्टेशन जवळ झालेल्या इनोव्हा गाडी आणी रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात एकाचं घरातील पाच जणांचा मृत्यू झाला असताना देखील आणी त्या घटनेला आठ दिवस झाले तरी अद्याप ना एकडे आमदार आले ना खासदार आले ना पालकमंत्री आले.त्यामुळे ज्या कुटुंबातील हे मयत आहेत त्यांचे मात्र आज तरी खाण्याचे वांदे दिसून येत आहेत.अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या नावे हे पुढील प्रमाणे १) मच्छींदरसिंग चरणसिंग गोके,२)दिपकसिंग मच्छींदरसिंग गोके,३) भारतीकोर दिपकसिंग गोके(पत्नी), ४)प्रियाकोर दिपकसिंग गोके(मुलगी वय २ वर्षे) ५) युवराजसिंग दिपकसिंग गोके (मुलगा वय ३ महीने) पत्ता भवानी माळ, धारूर रोड केज जि.बीड आणी यात ६) हरजितसिंग बादलसिंग टाक राहणार,जालना आंबेडकर नगर,७) चंदाबाई बादलसिंग टाक राहणार,जालना, आंबेडकर नगर तर पिसेगाव येथील बालाजी मुंडे हा रिक्षा चालक देखील त्यात मृत्यूमुखी पडला आहे. मात्र हे सर्व मृत्यूमुखी पडले असताना देखील आज तागायत कोणीही येथे भेट देण्यासाठी गेले नाहीत. आज काल मोठ्या लोकांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला साधी मुंगी जरी चावली तरी स्थानिक पातळीवरील नेते त्याचे सांत्वन करण्यासाठी अशी रीघ लावतात की जणू ते त्यांच्याच घरातील व्यक्ती आहेत मात्र आज शिकल करी समाजातील पाच जणांचा मृत्यू झाला असताना देखील अद्याप या कुटुंबाला ना वार्डाचा नगरसेवक ना केजचे नगराध्यक्ष, ना आमदार , ना खासदार तसेच समाज कल्याण मंत्री असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील सांत्वन करण्यासाठी उपस्थीत न राहिल्याने कुटुंबासह तालुक्यात एकच नाराजीचा सुर लोकप्रतिनीधी विरोधात उमटत आहे.गोके कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असुन समाजातील दानशुर व्यक्तींनी मदत करण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments