अंबाजोगाई : भाजपाच्या नुरुप शर्मा यांनी मोहंमद पैगंबर हुजुरे अकरम सल्लाहु अलैही सल्लम यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करत अंबाजोगाई शहरात सोमवार दि 6 जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या नुरुप शर्मा यांनी राष्ट्रीय वृत्त वाहिनीवर मोहंमद पैगंबर हुजुरे अकरम सल्लाहु अलैही व सल्लम व उम्मुल मोमीनीन हजरते आयशा सिद्दिखा रजिअल्ल्हाहू अन्हा यांच्या विषयी अपशब्द वापरुन , अपमान करुन , समस्त इस्लाम धर्मियांची भावना दुखावल्याने त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्याची मागणी करत अंबाजोगाई शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला . यावेळी मुस्लिम बांधाव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे . नुरुप शर्मा यांच्यावर तसेच संबंधीत वृत्त वाहिनी टाईम्स नॉऊ यांच्यावर सदर वृत्त जाणून जुबुन प्रकाशित केल्यामुळे व त्याचा उद्रेक केल्यामुळे तात्काळ कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
