केज : येथील मोंढा भागात सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकून झन्ना मन्ना जुगार खेळताना व खेळविताना ७ जण पकडले.यामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या सातही जणांवर केज पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील कारवाई आज दुपारी करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज कुमावत यांनी पदभार घेतल्यापासून अनेक अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलीस प्रशासनाचा जो धाक असणे सामान्य जनतेला अपेक्षित आहे तो दिसून येत आहे.आज दुपारी कुमावत यांना केज येथे मोंढा भागातील कन्हैया ट्रेडर्स जवळील मोकळ्या जागेत काहीजण झन्ना मन्ना नावाचे जुगार खेळत असल्याची खबर मिळाली. यावरून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून सदरील ठिकाणी छापा मारण्याचा आदेश दिला. त्यावरून सदरील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला तेव्हा सातजण गोलाकार करुन जुगार खेळताना दिसून आले. त्या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले.सदरील ठिकाणाहून झन्ना मन्ना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक चंद्रभान गित्ते यांच्या फिर्यादीवरून १) निरंजन अशोकराव बोबडे वय ३५ वर्षे ,रा.कळंब रोड ,केज, २ ) रामचंद्र विठठलराव गुंड वय ३२ वर्षे रा . गुंडगल्ली ,केज, ३ ) मनोज पांडुरंग घोरपडे वय ५१ वर्षे रा समर्थ नगर, केज ,४ ) बालासाहेब रामराव जाधव वय ५२ वर्षे रा .मोंढा मार्केट केज, ५ ) लिंबाजी शंकरराव राव शिंदे वय ६६ वर्षे रा .समता नगर केज, ६ ) सुशिल सज्जन अंधारे वय ४० वर्षे रा .मोंढा मार्केट , केज, ७ ) शेषराव लक्ष्मण कसबे वय 55 वर्षे रा . वकीलवाडी ,केज या सात जणांवर जुगार कायद्यानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सभापती असे राजकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती असल्याने केज शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सदरील कारवाई एएसपी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोह बालाजी दराडे ,पोह संभाजी दाराडे ,पोना अनिल मंदे ,पोकॉ संतोष गित्ते व दोन पंच यांनी केली आहे.
पंकज कुमावत यांच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा ; राजकीय क्षेत्रातील पदाधिकार्यांचा जुगाऱ्यांमध्ये समावेश
RELATED ARTICLES