केज : तालुक्यातील होळ येथे भरधाव वेगाने इनोव्हा कारने आपे रिक्षाला दिलेल्या धडकेत आठ जणांचा बळी गेला होता.चालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालून अपघाताला आणी आठ जणांच्या मृत्यू आला कारणीभूत ठरल्या प्रकरणी इनोव्हा चालकावर अखेर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भीषण अपघातातील एक जखमी अभिजीतसिंह बादलसिंग टाक वय १९ रा.जालना या युवकाच्या फिर्यादीनुसार,केज येथील त्यांच्या बहिणीच्या सासरच्या अंत्यविधीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून गुरुवारी दि.०२ जुन रोजी परळी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी ॲपे रिक्षातून एम एच २३ एक्स ५२२९ निघाले होते. वाटेत होळ येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक १६ सी एन ७०० चालकानी त्याची कार निष्काळजीपणे चालवून त्यांच्या ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात ॲपेरिक्षा चालक आणी टाक यांचे सात नातेवाईक असा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर अभिजीतसिंग टाक, आल्लासिंग दुर्गासिंग कालानी, कुलदीपसिंग गोके आणी इनोव्हा तील प्रवासी हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातास आणी आठ जणांच्या मृत्यूस इनोव्हाचा चालक कारणीभूत आहे. सदर फिर्यादीवरून इनोव्हा चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.
अखेर त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल..!
RELATED ARTICLES