केज : शेतीच्या सामायिक बांधावरून झालेल्या भांडणात ग्रामपंचायत सदस्यासह चौघांनी मारहाण केल्यामुळे एकाचा हात मोडला असून या प्रकरणी पोलीसात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास शालिंदर सखाराम गित्ते हे त्याच्या शेतातील सर्व्हे नंबर १४२ या मध्ये तुषार संच बदलण्यासाठी गेले असता त्यांच्या शेजारी शेत असलेल्या ग्रामपंचायत सदस्या मिना श्रीराम गित्ते यांनी दोघाच्या मध्ये असलेला सामाईक बांध नांगरलेला दिसला.ग्रामपंचायत सदस्या मिना गित्ते यांचे शेतामध्ये वेचणी करीत असलेले महादेव सुखदेव गिते,बलभिम तुकाराम गिते,पार्वती महादेव गिते आणी स्वतः मिना श्रीराम गिते यांना शालिंदर गित्ते म्हणाले की,तुम्ही सामाईक बांध का फोडला ? असे विचारले असता; ते म्हणाले की, आमचा बांध आहे.आम्ही काढून घेतला तुला काय करायचे ते कर तेवढ्यात महादेव सुखदेव गिते याने शेतात पडलेली काठीने शालींदर गित्ते याच्या डाव्या हातावर मारून हात फ्रॅक्चर केला. बलभिम गिते,पार्वती गिते व मिना श्रीराम गिते या सर्वांनी मिळून शालिंदर गित्ते याला लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान दिनांक २ जून रोजी शालींदर गित्ते यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार महादेव सुखदेव गिते,बलभिम तुकाराम गिते,पार्वती महादेव गिते आणी ग्रामपंचायत सदस्या मिना श्रीराम गिते रा.साळेगाव ता.केज या चौघा विरुद्ध गु.र.नं. २१०/२०२२ भा.दं.वि. ३२३,३२६,५०४, आणी ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.
शेतीच्या बांधावरून झालेल्या मारहाणीत एकाचा हात मोडला
RELATED ARTICLES