केज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. लवकरच प्रत्येक पक्षाचे उमेदवार जाहीर होतील.त्यासाठी उमेदवारांची रस्सीखेस पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येणार आहेत त्यासाठी राष्ट्रवादी कडून उमेदवार दोन उमेदवार जाहीर होणार आहेत.त्यासाठी पक्षाकडून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केजच्या शहराध्यक्षा सौ. शितलताई लांडगे यांनी केली आहे . राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार बीड जिल्ह्यात तळागाळापर्यंत तसेच जनतेच्या मनात व प्रत्येक घरात पोहचवण्याचे काम त्याचबरोबर महिला सक्षम बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी काम केले आहे .पक्ष वाढीसाठी ते सतत अग्रेसर असतात तसेच केज तालुक्यातील आनंदगांव येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव देण्याचे काम त्यांनी केले आहे.बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.त्यांनी आजपर्यंत केलेले समाज कार्य व पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न याची पक्षाने दखल घेऊन राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे याना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केजच्या शहराध्यक्षा सौ.शितलताई लांडगे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना विधान परिषदेवर घ्यावे ; सौ.शितलताई लांडगे.!
RELATED ARTICLES