केज : नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत केज येथील चि.सक्षम यमाजी ढाकणे याने २१ ते २५ किलो वजन गटातून द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले आहे.केज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस नाईक श्रीमती आशा चौरे यांचा सुपुत्र सक्षम यमाजी ढाकणे याने नेपाळ देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेची तयारी केली होती.या स्पर्धेत सक्षम ढाकणे याने २१ ते २५ किलो वजन गटातून द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले आहे.त्याने या स्पर्धेत यश संपादन करीत बीड जिल्ह्याचे व केज तालुक्याचे नावलौकिक केले आहे. त्याला प्रशिक्षक अनिल ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर राष्ट्रध्वजासह सक्षम ढाकणे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तालुक्यातून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सक्षम ढाकणे ला रौप्यपदक.!
RELATED ARTICLES