HomeUncategorizedरिक्षा व ईनोव्हाच्या भीषण अपघातात दोन बालकासह चौघेजण ठार.!

रिक्षा व ईनोव्हाच्या भीषण अपघातात दोन बालकासह चौघेजण ठार.!

केज : अंबाजोगाई रोडवर होळ नजीक भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोठी जीवितहानी आहे. यात चौघे ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात केज-अंबाजोगाई रस्त्यावर होळ शिवारात आज दि.२सायंकाळी साडेपाच वाजता घडला.मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके वय ३५ रा. केज असे रिक्षातील प्रवाशाचे तर बालाजी संपती मुंडे वय २८ रा.पिसेगाव ता.केज अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय दोन बालके ज्यांची नावे समजू शकली नाहीत मृत झाली आहेत. तसेच दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा गाडी एम.एच.१६ सी. एन. ७०० व समोरून येत असलेल्या रिक्षा एम.एच.२३ एक्स ५२२ यांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की,रिक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. खाजगी वाहने व रुग्णवाहिकांमधून जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने आणण्यात नेण्यात आले. घटनास्थळी अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. युसूफवडगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार दोन्ही वाहनातील दहा हुन अधिक व्यक्ती जखमी झाले आहेत.यापैकी जखमींचा अधिकृत आकडा व नावे समजू शकलेली नाहीत.केज – अंबाजोगाई रोडवर अपघाताचे सञ थांबताना दिसत नाही .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments