गेवराई : माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला, शिबीरामधील तपासणी झालेल्या रुग्णांवर दि. १ जुन पासुन उप जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. पहिल्या टप्यात यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पुथ्वीराज पंडित यांच्या हस्ते काळ्या चेष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब नाटकर, दिपक आतकरे, राधेशाम येवले, डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. मांडवे, डॉ. काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाव्दारे साजरा करण्यात आला. मोफत नेत्र तपसणी व शस्त्रक्रिया शिबीर, अवयव दान मोहिमेचा शुभारंभ, राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ, कोविड योद्धयांचा सन्मान, ई-श्रम कार्ड नोंदणी आदी उपक्रम यावेळी यशस्वीरित्या राबविण्यात आले, सर्व उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला. मोफत नेत्र तपासणी नंतर शस्त्रक्रियेस पात्र झालेल्या रुग्णांवर उप जिल्हा रुग्णालयात बुधवार दि. १ पासुन शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या पहिल्या टप्याामध्ये १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पुर्ण झाल्या. गुरुवार दि. २ जुन रोजी या रुग्णांना डिस्चार्ज देतांना पृथ्वीराज पंडित यांच्या हस्ते काळ्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध रुग्णांनी आभार व्यक्त करुन अतिशय भावनिक होवुन अमरसिंह पंडित यांना आशिर्वाद दिले. असेच सामाजिक उपक्रम राबवुन गोर-गरिबांची सेवा त्यांच्या हाताने घडो अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तलुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी उप जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नेत्र तज्ञ, नर्स व इतर स्टाफ यांचे आभार व्यक्त करत रुग्णालयामध्ये आजवर अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त व्हेंटीलेटर मशिन, एक्सरे मशिन, ईसीजी मशिन यासह इतर साहित्य कोविड संक्रमणाच्या काळात उपलब्ध करुन देतांना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सातत्याने आरोग्य यंत्रणे बरोबर उभा राहिल्याचे सांगितले. उप जिल्हा रुग्णालयात अखंडपणे सुरु असलेल्या अन्नछत्राच्या माध्यमातुन रुग्णांना दररोज सकाळी अल्पोपहार देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, तालुका उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, नगरसेवक राधेशाम येवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, राष्ट्रवादी सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष संदिप मडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, रुग्ण उपस्थित होते.
अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित पहिल्या टप्यातील नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी.!
RELATED ARTICLES