केज : तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल गलांडे यांची तर सचिवपदी श्रीराम तांदळे,उपाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील व सचिन साखरे तर कोषाध्यक्ष पदावर तात्या गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी त्यांना काही त्रास होऊ नये शासकीय यंत्रणेने लोकांची कामे वेळेवर करावेत आणी जनतेला काही त्रास होऊ नये म्हणून केज येथील पत्रकारांनी एकत्र येत जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष पत्रकार संघाची स्थापना शासकीय विश्रागृहावर बैठक घेऊन करण्यात आली.यावेळी नूतन अध्यक्ष अनिल गलांडे यांनी हा संघर्ष पत्रकार संघ कोणत्याही राजकीय पुढारी किंवा नेत्यांच्या दावणीला बांधलेला नाही आणी राहणार पण नाही यामुळे सर्व संघर्ष पत्रकार संघ सर्व सामान्यांची कामे अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून काम करण्यात येईल असे उदगार त्यांनी यावेळी केले.सर्वांनुमते कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष अनिल गलांडे, सचिव श्रीरामतांदळे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन साखरे,कोषाध्यक्ष तात्या गवळी, सहसचिव गणेश सत्वधर,तर सदस्य पदी अर्शद शेख,सनी शेख,वाजेद शेख,अशोक भोसले,अरविंद थोरात यांच्या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन निवड करण्यात आली.निवडीबद्दल नवीन पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल गलांडे तर सचिवपदी श्रीराम तांदळे यांची एकमताने निवड.!
RELATED ARTICLES