HomeUncategorizedकर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..!

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..!

केज : तालुक्यातील डोका येथील तरुण शेतकऱ्याने बँकेचे कर्ज व पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. केज तालुक्यातील मौजे डोका येथीलअल्पभूधारक तरुण शेतकरी सतीश दशरथ भांगे वय ३०वर्ष यांच्याकडे बँकेचे कर्ज आहे. आज खरीप हंगामाची पेरणी जवळ आलेली असताना पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सतीश यांचा अतिशय मनमिळाऊ स्वभाव होता म्हणून या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आज घरातील कर्ता कुटुंबप्रमुख गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी चर्चा गावातील लोकांमध्ये होताना दिसून आली.त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी व तीन मुली असा मोठा परिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments