जॅक रोडवर ठेवून लुटमार करुन दरोडा टाकणाऱ्या पाचही आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी.
केज : रात्रीच्या वेळी महामार्गावर जॅक ठेवून वाहन अडवून वाहनातील लोकांना मारहाण करून त्यांच्याकडील नगदी ऐवज व दागिने काढून घेणाऱ्या वाटमारी प्रकरणातील आरोपीना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.केज तालुक्यातील मस्साजोगजवळ मध्यरात्री रस्त्यावर जॅक ठेवून वाहन अडवून लूटमार करणाऱ्या प्रकरणी दिनांक २८ मे रोजी बीड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन शिवाजी काळे वय २४ वर्षे रा.पारा ता.वाशी,पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापु शिंदे वय २२ वर्षे रा. खोमनवाडी शिवार ता. केज,रामा लाला शिंदे वय २३ वर्ष रा.नांदुरघाट,दादा सरदार शिंदे वय ४५ वर्ष रा.नांदुरघाट,विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार वय २२ वर्ष रा.चिंचोली माळी गायरान ता.केज यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.दरम्यान दिनांक २९ मे रोजी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक थोरात,जोगदंड, अशोक नामदास,संतोष गित्ते,शमीम पाशा आणी वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी आरोपीना अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक २ जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीवर दाखल असलेले गुन्हे :- दिनांक ७ मे रोजी पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास बीड कडुन अंबाजोगाईकडे जात असलेली कार मांजरसुंबा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर सारणी-सांगवी पाटी जवळ रोडवर जॅक ठेवून कार चालकाने जॅक घेण्यासाठी कार थांबविली असता दबा धरुन बसलेले अनोळखी सहा ते सात अज्ञात आरोपीनी चालकाला व गाडीतील इतर लोकांना मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम व दागीने बळजबरीने लुटले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन केज गु.र.नं.१६१/२०२२ भा.दं.वि.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच त्यानंतर बरोबर १५ दिवसानंतर दिनांक २३ मे रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर मस्साजोग शिवारात रोडवर जॅक ठेवून ट्रक चालकाने जॅक घेण्यासाठी ट्रक थांबविल्यानंतर दबा धरुन बसलेले अनोळखी अज्ञात आरोपीनी ट्रक चालकाला मारहाण करुन त्यांचे कडील रोख रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने लुटले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन केज येथे गु.र.नं. १८८/२०२२ भा.दं.वि. ३९४ आणी ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे करण्याची पध्दतः-सदर आरोपी हे रात्रीच्या वेळी एकत्रीत येवून महामार्गावर जॅक ठेवून जॅक घेण्याच्या अमिषाने वाहन चालकाने वाहन थांबवून चालक जॅक घेण्यासाठी गेल्यानंतर दबा धरुन बसलेले आरोपी वाहन चालकाला तसेच वाहनातील इतर लोकांना मारहान करुन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम, मौल्यवान वस्तु व इतर साहित्य बळजबरीने लुटमार करायचे.सदर आरोपींवर यापुर्वी चोरी, जबरी चोरी,दरोडा, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड आणी उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत.सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.वरील गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्येमालाबाबत व त्यांनी केलेल्या आणखी गुन्ह्या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आणी पोलीसउपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.बीड येथील गुन्हे अन्वेशन विभागाने केलेल्या तपासाबद्धल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.