बीड : 13 वी NSKA आंतरराष्ट्रीय कराटेची स्पर्धा नेपाळ या देशाची राजधानी काटमांडू येथील रंगशाला आंतरराष्ट्रीय स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून मूख्य प्रशिक्षक तथा कराटे असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष अॅड.नितीन पवार सर यांनी काम पाहीले. व त्याचे सहकारी म्हणून महीला प्रतिनिधित्व आरती सतकर मॅडम व सूधीर आपरे सर. या स्पर्धेत बीड जिल्ह्य़ातील 14 विद्यार्थीच्या सहभाग होता.त्याच बरोबर मूख्य प्रशिक्षक अॅड.नितीन पवार सर यांनी तीथे रेफ्री व जज च्या परीक्षेत ही पास होऊन A प्लस ग्रेड घेतले. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये 3 सूवर्ण,6 रोप्य,5 कास्य पदके पटकावली.यात विद्यार्थी म्हणून सार्थक वाघमारे, अवनी सावंत, राणा नाईक, सारंग लांगोरे ,शुभम हावळे, तेजस सावंत, खूशी वाघमारे, शिवनंदन झोडगे, अथर्व गोसावी, अतुल घाडगे, नकुल भवर, दुर्गा कडू,व श्रेयस वाघमारे यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेला 6 विविध देश सहभागी होते.यामध्ये बीडच्या विद्यार्थ्यांकडून आपली मोलाची कामगीरी पत्कारत आर्यन योद्धा कराटे ग्रूप ( बीड जिल्हा ) आपल्या बीडच्या नावसोबतच आपल्या देशाचे सूध्दा नाव रोषन केले आहे.
नेपाळ,काटमांडू येथील 13 वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बीडच्या विद्यार्थ्याना 14 पदके
RELATED ARTICLES