HomeUncategorizedमालकी हक्काच्या जागेतून फुकट रस्ता द्यावा म्हणून प्रशासनावर दबावतंञाचा वापर

मालकी हक्काच्या जागेतून फुकट रस्ता द्यावा म्हणून प्रशासनावर दबावतंञाचा वापर

केज : शहरात मालकी हक्काच्या जमीनीतुन फुकट रस्ता द्यावा म्हणून काही गावगुंडानी प्रकरण सुरु असताना तहसील कार्यालयाला उपोषणाचा इशारा देऊन महसुल प्रशासनावर दबाव टाकू लागले आहेत.केज शहरातील धारुर रोड वरील सर्वे.नं.११८/५ मधील मुळ जमीन मालकाकडून ही जागा सय्यद अमजद व फुरखान शेख यांनी २०१२ साली रितसर खरेदीखत करुन घेतली होती खरेदी खत आधारे नगरपंचायत व सात बारावर कायदेशीर नोंद करुन घेतली असुन या जागेचा प्रकरण न्यायालयात व तहसील कार्यालयात सुरु असुन काही खंडणीखोर लोंकाच्या भडकावणीत येऊन काही नागरिकांनी तहसील कार्यालयाला उपोषणाचे निवेदन देवून महसुल प्रशासनावर दबाव टाकू लागले आहेत.सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना उपोषण करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा अशी मागणी जागा मालकाच्या वतीने करण्यात आली आहे.”त्या”शेतकऱ्यांनी केला न्यायालयाचा अपमानया जागेचा प्रकरण केज न्यायालयात सुरु असुन दिवानी न्यायालय क्र.१६६/२०२२ जुनियर डीव्हीजन जे.एम एफ सी कोर्ट केज येथे हे प्रकरण सुरु असुन मालकी हक्काच्या जागेतून रस्ता फुकट मिळावा म्हणून या शेतकऱ्यांनी थर्डपार्टीला या प्रकरणात सहभाग घेतला होता मात्र पुराव्या अभावी त्या शेतकऱ्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments