HomeUncategorizedगेवराई येथे होणार मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

गेवराई येथे होणार मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

गेवराई : माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. कृष्णाई येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र तपासणी करुन निवडलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन करण्यात आले आहे. अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गेवराई येथे होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेवराई शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. कृष्णाई निवासस्थानी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दुपारी 12 वा. कृष्णाई येथे अवयव दान संकल्प मोहिमेचा शुभारंभ, दुपारी 2 वा. मराठवाडा पदविधर मतदार संघाचे आ. सतिष चव्हाण यांच्या उपस्थितीत र.भ.अट्टल महाविद्यालय येथे कोविड योद्धयांचा सन्मान, दुपारी 4 वा. राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते कृष्णाई येथे होणार आहे. सायं. 5 वा. ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शुभारंभ होणार असुन दि. 1 जुन रोजी डॉ. सर्वोत्तम शिंदे यांच्या माध्यमातुन सकाळी 11 ते 3 यावेळेत श्रीसाई सोनोग्राफी व स्किन केअर सेंटर येथे त्वचा रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु असुन मोबाईल क्रमांक 9049887750 व 8080063241 वर संपर्क करुन आपली नोंदणी करण्याचे आवाहन जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments