बीड- चंद्रकांत पाटील :- येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि.बीडचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक सदस्य श्री. सत्यनारायणजी लोहिया यांचा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अटीतटीच्या निवडणूकीत अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित उत्कर्ष पॅनलचे जेष्ठ संचालक श्री. सत्यनारायणजी लोहिया हे प्रचंड मताने निवडूण आले आहेत. त्यांचा गेल्या ५० वर्षापासून भारतीय शिक्षण प्रसारकमंडळाच्या कार्यात सहभाग होता.ते संस्था सभासद आहेत. तसेच बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल येथे स्थानिक कार्यवाह म्हणुन काम पाहिले आहे ते उपाध्यक्ष व संचालक म्हणून राजस्थानी सेवा समाज मंडळाचेही सदस्य होते. बऱ्याच वर्षापासुन मराठवाडा अर्बन बँक्स असोसिएशन व बीड जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित उत्कर्ष पॅनल’ मधून श्री. सत्यनारायणजी लोहिया हे दणदणीत विजयी झाल्याने त्यांचा बँकेच्या मा.संचालक मंडळाने सत्कार केला. या सत्कार प्रसंगी बँकेचे अध्यक्ष इंजि.अजय पाटील, उपाध्यक्ष प्रा.नारायण मस्के, संचालक इंजि. प्रकाश भांडेकर, श्री. रावसाहेब आगळे, अॕड. शहाजीराव जगताप,अॕड. पांडुरंग भोसले,रामहारी गव्हाणे,श्री.विक्रम जाधव, श्री. श्रीरंग गोरकर, श्री. सुर्यभान भोसले, इंजि. अभय कदम, सी.ए. आनंद लोहिया तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भगवान पवार,व्यवस्थापक श्री. मारुती चाळक यांच्या सह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यनारायणजी लोहिया यांचा छत्रपती राजर्षी शाहू बँकेच्या वतीने सत्कार संपन्न
RELATED ARTICLES