बीड – चंद्रकांत पाटील :- येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक लि.बीडचे संचालक अॕड. शहाजीराव जगताप यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणी गोवा यांचे वतीने गठीत केलेल्या शिस्तपालन समितीवर निवड झाली असल्याने बँकेच्या मा.संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.अॕड.शहाजीराव जगताप हे बऱ्याच वर्षापासुन बीड न्यायालय तसेच श्री छत्रपती शाहू बँकेच्यासंचालक मंडळात असुन ते बीड जिल्ह्यातील वकील बांधव त्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे.वकील बांधवाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.म्हणूनच त्यांची महाराष्ट्र आणी गोवा बार कौन्सिलच्या शिस्त पालन समितीवर निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा शाल पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी सत्कार करतांना बँकेचे अध्यक्ष इंजि.अजय पाटील, उपाध्यक्ष प्रा. नारायण मस्के, संचालक सत्यनारायणजी लोहिया, इंजि.प्रकाश भांडेकर, श्री. रावसाहेब आगळे, श्री. विक्रम जाधव, श्री.श्रीरंग गोरकर, श्री. सुर्यभान भोसले, ॲड. पांडुरंग भोसले, श्री. रामहरी गव्हाणे, इंजि. अभय कदम, सी. ए. आनंद लोहिया, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भगवानपवार,व्यवस्थापक श्री.मारुती चाळक आदी मान्यवार उपस्थित होते.
ॲड.शहाजीराव जगताप यांचा श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेच्या वतीने सत्कार संपन्न
RELATED ARTICLES