बीड : वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) बीड जिल्हा कार्यालयामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रु.10 लाख (बॅकमार्फत), गट कर्ज व्याज परतावा रु. 50 लाख योजनेचे उद्धिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन्ही योजना ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येणार असून अर्जदारांना vjnt.in या वेब प्रणालीवर अर्ज करणे अनिवार्य आहे. बीज भांडवल कर्ज योजनेसाठी महामंडळाचा अंर्तगत सहभाग 25% साठी महामंडळाची तर राष्ट्रीय कृत बॅक सहभाग 75% साठी बॅकेची नियमावली राहील असे एकूण रुपये 5 लाख योजनेचे सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचे उद्धिष्ट प्राप्त झाले असून विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नवउद्योजक अनुभवी तरुण, तरुणींनी अर्जासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला (झेरॉक्स प्रत), सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, रहीवाशी दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड (झेरॉक्स प्रत), पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, प्रकल्प अहवाल व दरपत्रक( कोटेशन), अनुभव प्रमाणपत्र व व्यवसायाचा परवाना (उदयोग आधार), नाहरकत प्रमाणपत्र इ. कागदपत्र सोबत घेउन जिल्हा कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन आर. एस. नरवडे, जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज.विकास महामंडळ (मर्या.) बीड. यांनी केले आहे.
वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन..!
RELATED ARTICLES