HomeUncategorizedयेडेश्वरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २८ मे रोजी संपन्न होणार

येडेश्वरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २८ मे रोजी संपन्न होणार

केज परिसर व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद,यांना कळविण्यात येते की, कारखान्याचा चालू गळीत हंगाम २०२१-२२ या हंगामात लागवडीची विक्रमी नोंद झाली होती.आपण अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम व काटेकोर नियोजन करुन उसतोड प्रोग्राम राबविल्यामुळे नोंदलेल्या ऊसापैकी सभासद/बिगर सभासद यांच्या ऊसाचे गाळप जवळपास पूर्ण होत आलेले असून, कारखान्याचा चालू गळीत हंगाम दिनांक २८-०५-२०२२ रोजी बंद होणार आहे.सभासद आणी बिगर सभासदांचा चालू गळित हंगामातील नोंदविलेला अथवा करार केलेला ऊस गाळपपात्र ऊस गाळपासाठी सर्व ऊस ऊत्पादकांनी आपल्या ऊस गाळपाच्या शेतकी विभागाशी संपर्क साधून आपला ऊस दिनांक २८-०५-२०२२पुर्वी गाळपासाठी आणावा तसेच ज्या सभासद / बिगर सभासदांच्या ऊसाची काही कारणामुळे तोड होऊ शकलेली नाही, अशा सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी ऊसाची स्वतः तोड व वाहतूक करून कारखाना बंद होण्यापुर्वी सदर कारखान्याकडे गळीतास पाठवून द्यावा.वरील प्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे ऊस गाळपा अभावी शिल्लक राहील्यास कोणत्याही प्रकारची जबाबदारी कारखान्यावर राहणार नाही तसेच नुकसान भरपाई मागणेचा हक्क राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन येडेश्वरी साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments