बीड : आज दिनांक २४ मे वार मंगळवार रोजी पहाटे ४ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग लिंबागणेश येथे महावितरण कार्यालयजवळ पिक अप आणि ट्रक्टरचा भिषण अपघात होऊन त्यात ५-६ जण गंभीर जखमी झाले असून राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस पथक व नेकनुर पोलीस स्टेशन येथील पथकाने घटनास्थळी भेट देऊन स्थळपंचनामा केला असून जखमींना जिल्हारूग्णालयात पाठविण्यात आले आहे. यात श्री.महादेव बप्पा जाधव रा.लिंबागणेश हे गंभीर जखमी झाले आहेत त्याचबरोबर पिक अप क्रमांक एम.एच.२४ एबी ६४६० मधील उदगीर येथील बबन सोपान सुर्यवंशी वय ५० ,कुंडलिक गंगाराम सुर्यवंशी वय ६० ,कांशीराम सुर्यवंशी वय ५० ,चंद्रकांत विश्वंभर माने वय ३८ (चालक),अनुसया अच्युत सुर्यवंशी,मंडुबाई केरबा गायकवाड ६० ,सिंधुबाई धमाजी माने वय ४५ वर्षे जखमी असून त्यांना रूग्णवाहीकेतुन दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.
