HomeUncategorizedअश्वगंधाच्या शेतीतून शेतक-यांना होणार लाखो रुपयांचे उत्पादन...

अश्वगंधाच्या शेतीतून शेतक-यांना होणार लाखो रुपयांचे उत्पादन…

अर्धापूर : केळी पिकासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर तालुक्यांमधील शेतकरी हे सध्या औषधी वनस्पतीचे उत्पादन घेऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवीत असून तालुक्यातील लहान येथील शेतकऱ्यांनी अश्वगंधा औषधी वनस्पतीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून शेतकरी यातून कमी कालावधीत चांगला नफा देखील कमवत आहेत. तालुक्यातील लहान येथील नऊ शेतकऱ्यांनी मिळुन असाच एक शेतीचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.लहान येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वी केला त्यापाठोपाठ आता त्यांनी चाभरा व लहान परिसरातील शेतकरी बालाजी इंगळे, व्‍यंकटी इंगळे, गोविंद इंगळे, विनायकराव देशमुख, प्रवीण गिरी, नरेश चाभरकर, राघोजी फरांदे अशा नऊ शेतकऱ्यांना एकत्र घेऊन १४ एकर शेतीत औषधी वनस्पती ची लागवड केली. कमी खर्चात कमी वेळात चांगले उत्पन्न मिळणाऱ्या अश्वगंधा वनस्पतीच्या शेतीतून सरासरी एकरी ६० ते ७० हजार रुपये नफा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.आसमानी संकटे व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पारंपरिक शेती करणे मुश्कील झाले होते. शेतीला वारंवार बसणारा नैसर्गिक आपत्तींचा फटका व वाढणारा रोगांचा प्रादुर्भाव यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील लहान येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत अश्वगंधा या औषधी वनस्पतींची १४ एकर शेतात लागवड केली.अश्वगंधाची मुळे, पाने आणि बियांची विक्री करून गुणवत्तेनुसार लावगड खर्च ५० हजार रूपये जाता एकरी ६० ते ७० हजार रुपये नफा मिळू शकतो. निंदणी, खुरपणी, औषध फवारणी व काढणी आदी एकरी पन्नास हजार रुपये खर्च आला असून सरासरी सव्वा ते दीड लाखाचे उत्पन्न येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.तालुक्यात प्रथमच लागवडअर्धापूर तालुक्यात अश्वगंधा औषधी वनस्पतीची लागवड करत पहिले म्हणून लहान परीसरातील शेतक-यांनी इतिहास रचला आहे.खर्चात बचत व उत्पादनात वाढ गटशेतीचा फायदागटशेती केल्यामुळे बियाणे, खते, तंत्रज्ञान, वाहतूक हे सर्व खरेदी स्वस्तात झाले खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात घट व उत्पादन वाढ यामुळे गटशेतीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने नवनवीन प्रयोग करत औषधी वनस्पतींची लागवड करत कृषी क्षेत्रात चांगला नफा मिळवता येतो. अशी प्रतिक्रिया निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तमराव इंगळे यांनी या वेळी बोलतांना दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments