अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भूमचा दणका
भुम : 18 मार्च 2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून इनोवा क्रिस्टा या वाहनातून प्रवास करत असताना बीड येथील दाम्पत्य विशाल बडे व त्यांच्या पत्नी वर्षा बडे यांच्यावर वाशी फाटा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी गाडी अडवून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करून दरोडा टाकण्यात आला होता त्यात त्यांना गंभीर स्वरूपाचे मारहाण झाली होती व त्यांच्याकडील काही सोन्याचा ऐवज लुटण्यात आलेला होता याप्रकरणी वाशी पोलिसांनी तपास करून एकूण 14 आरोपींना अटक केलेली होती. याप्रकरणी कलम 395,324,323,504,506 भा.दं.वी गुन्हा दाखल करण्यात आला होता ,त्यांना सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली त्यांचे पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भूम यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती सदर आरोपींनी दिनांक 13 मे रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय भूम येथे जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यावरील सुनावणी झाली असता न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे, याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने बीडचे नामांकित वकील ॲड अविनाश गंडले व ॲड.इम्रान पटेल,ॲड नामदेव माने यांनी कामकाज पाहिले आहे. पुढील तपास उस्मानाबाद पोलीस करत आहे.