बीड : देशात वेगवेगळ्या संस्था या वेगवेगळ्या व्यवस्थेवर अंकुष ठेवण्याचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे शासन आणि प्रशासन यांचेवर सर्वंकश अंकुष ठेवणारी सर्वोच्च व्यवस्था म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त असल्याचे प्रतिपादन अँड. विजयसिंह माने (उस्मानाबाद) यांनी केले आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आयोजीत तीन दिवसीय मराठवाडा स्तरीय प्रशिक्षण शिबीरात बीड येथे विठाई हाॅस्पिटलच्या सभागृहात कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंदोलनाचे राज्यसमिती विश्वस्त अँड. अजित देशमुख होते. प्रशिक्षण शिबीराच्या दुस-या दिवशी लोकपाल आणि लोकायुक्त या विषयावर बोलतांना अँड. माने पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराने संपुर्ण जगाला विळखा घातलेला आहे. भ्रष्टाचारी मनोवृत्तीवर घाव घालण्याचे काम करण्यासाठी १९६० साली लोकपाल, लोकायुक्त हा विषय चर्चेत आला. पुढे १९६६ ला याबाबत शिफारस केली गेली. तिथुन पुढे जवळपास आठ वेळा हा कायदा संसदेत आला. पण तो पास झाला नाही. त्याचे कारण याच्या भिती पोटी नको होता. अखेर जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे यांनी देशभरात मोठे जन आंदोलन केले. या आंदोलनाला यश मिळून २०१९ ला लोकपाल नियुक्त झाला. केंद्रात लोकपाल नियुक्त झाले. मात्र त्या धर्तीवर राज्यात अजुनही लोकायुक्तांची नेमणूक होत नाही. लोकपाल आणि लोकायुक्त याची व्याप्ती एव्हडी मोठी आहे की, यातून जवळपास कुणीही सुटला जात नाही. लोक प्रतिनिधींचा यात समावेश तर आहेच. परंतू मुख्यमंत्री देखील या लोकायुक्ताच्या परिघात असल्याचे येणार असल्याचे अँड. विजयसिंह माने यांनी सांगितले.लोकायुक्ताच्या नेमणूकिसाठी सतत जेष्ट समाज सेवक सरकार बरोबर पत्रव्यवाहर करून पाठपुरावा करत आहेत. मात्र सरकारची तशी ईच्छाच दिसत नसल्याने पुन्हा एकदा लोकायुक्त नेमणूकिसाठी व्यापक लढा उभारण्याची गरज असुन मा. अण्णा लवकरच आपला निर्णय जाहिर करतील, असे सांगितले. देशात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त ही कार्यप्रणाली सुरू झाल्यास भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास एक सक्षम पर्याय ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बीड सह औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातुर, जालना जिल्ह्यातील आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबीरात प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या विषयातील तज्ञ उपस्थित राहुन त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्याला आरोग्य, कायदा व सुव्यवस्था तसेच परिसर याबाबत सर्वंकश माहिती देण्याचे काम शिबीराच्या माध्यमातून झाले. शेवटी आंदोलनाचे विश्वस्त अँड..अजित देशमुख यांनी आभार मानले.
सक्षम लोकपाल आणि लोक आयुक्त प्रशासनावर अंकुश ठेवू शकतो ; अँड. विजयसिंह माने..!
RELATED ARTICLES