भाजी पाला फळ विक्रेतेना कापडी पिशव्याचे मोफत वाटप डॉ मनिषा पालीवाल यांचा स्तृत्य उपक्रम
संग्रामपुर : वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात झाल्याने व सतत सुरु असलेल्या वृक्ष तोड मुळे निर्सगातही बदल झाला प्रदुषणात वाढ झाली वाढते तापमान, पाण्याची कमतरता, वाढते प्रदूषण त्यात प्लॅस्टिक कॅरीबाग चा अतिवापर मानव जीवनास धोकेदायक ठरत आहे. ह्यावर उपाय म्हणून वृंदावन नगर अकोला येथील डॉ. मनीषा पालीवाल, डॉ. योगेश पालीवाल व सिद्धेश पालीवाल यांनी एक आगळावेगळा स्तृत्य उपक्रम राबविला. फळविक्रेते व भाजिविक्रेते ह्यांचे जवळ जाऊन “प्लॅस्टिक कॅरीबाग ची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा” , “झाडे लावा झाडे जगवा”, वृक्ष=मोक्ष, प्रत्येक गोष्टीला शासनच का जबाबदार,आपण कधी होणार समजूतदार” असे संदेश देणारे फलक घेऊन उभे राहिले व प्रत्येक फळ,भाजी घेणाऱ्या व्यक्तीस कापडी पिशवी मोफत वाटप केली पी. डी. के. वी. परिसर, जवाहर नगर,गोरक्षण रोड ह्या परिसरात 220 कापडी पिशव्या व उपरोक्त संदेश देणारे 26 फलकांचे मोफत वाटप त्यांनी केले. डॉ पालीवाल दाम्पत्यांचे नागरिकांनी कौतुक केले त्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमास उत्सर्फुत प्रतिसाद दिला व यापुढे प्लॅस्टिक कॅरीबाग वापर टाळण्याचा वचन दिले. डॉ. मनीषा पालीवाल व डॉ. योगेश पालीवाल नेहमी पर्यावरण संवर्धणास पूरक कार्य करीत असतात. रोप वाटणे, कुंडीत जगवलेले झाड वाटणे, बियाणे बँक , हळदी कुंकू सोबत कापडी पिशव्या वान म्हणून वाटणे, सायकल वापरावर सर्वांनी भर द्यावा म्हणून जनजागृती अभियान असे अनेक कार्य ते दर वर्षी करत असतात. कोरोना काळात मोफत ऑक्सिजनची व्यवस्था, सोबत त्यांनी कोरोना काळात अनेक रुग्णांवर मोफत उपचारही केले.प्लास्टिक वापर टाळण्यासाठी लोकसहभाग गरजेचे डॉ मनिषा पालीवालप्लास्टिक कमी वापर साठी शासन स्तरावरुन जनजागृती करित आहे परंतु प्रत्येक व्यक्तीच्या सहभागा शिवाय प्लॅस्टिक वापर कमी होणे शक्य नाही. प्लास्टिक वापर कमी करा हि लोकचळव व्हावी या साठी प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी जातीने याकडे लक्ष व योगदान देणे गरजेचे आहे एकना एक दिवस नागरिकांच्या प्लॅस्टिक वापर टाळतील व कापडी पिशवीचा वापर करतील असे नागरिकां कडून अपेक्षित असुन या साठी प्लास्टिक वापर टाळा जन जागृती व मोफत कापडी पिशवी वाटप उपक्रम हि जनहितार्थ राबविण्याची सुरुवात केली यात यश मिळेलच असा आशावाद डॉ. मनीषा पालीवाल यांनी बोलतांना व्यक्त केला
