केज: मानवी जीवितास धोका निर्माण करणारे स्फोटक पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, दिनांक २२-०५-२०२२ रोजी ०३-३५ वाजता सुलेमान इस्माईल शेख रा. सावळेश्वर पैठण याने केज शहरातील कळंब रोडवरील आयडीबीआय बँकेच्या समोर स्वताचे फायद्यासाठी स्फोटक पदार्थ कब्जात बाळगुन स्फोटक पदार्थ ज्यामुळे मानवी जिवीत धोक्यात येईल,अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत,अगर नुकसान पोहचण्याचा संभव आहे. इतक्या बेदरकारपणे सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता हयगयीने स्फोटक पदार्थ, दारुच्या आवाजाचे फटाके आणि शोभेची दारु बाळगुन हयगयीचे वर्तन केल्याचे निदर्शनास आले. सदर माहितीवरुन केज पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून सुमारे दीड लाखांचे स्फोटक पदार्थ जप्त करून पोलिस हवालदार उमेश बाबुराव आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
केज पोलिसांचा फटाके गोडाऊनवर छापा.!
RELATED ARTICLES