बीड : शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील असलेला काज़ी फ़राज़ूद्दीन आपली बुद्धी व मेहनतीच्या जोरावर एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनला आहे. या यशामुळे त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.काज़ी फ़राज़ूद्दीन मोईज़ोद्दीन ने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण नॅशनल उर्दू स्कूल येथे घेतले तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मिल्लिया उर्दू महाविद्यालयात घेतले नंतर नीट परीक्षेत चांगले गुण घेतल्याने त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे एम.बी.बी.एस. साठी नंबर लागला. एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेताना चारही वर्षात सातत्याने चांगले गुण घेत त्याने एम.बी.बी.एस.पदवी मिळवली. आता त्याला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच एक वर्ष इंटर्नशिप करायची असून इंटर्नशिप संपल्यानंतर तो एम.डी. चे शिक्षण घेण्याची तयारी करणार आहे. फ़राज़ुद्दीन ने मिळवलेल्या यशाने त्याचे वडील मोईज़ोद्दीन यांचे मित्र शेख महेमूद गुत्तेदार, शेख शौकत, शेख अय्युब, शेख रऊफ़ आणि मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी हृदयी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सामान्य कुटुंबातील काज़ी फ़राज़ुद्दीन बनला एमबीबीएस डॉक्टर
RELATED ARTICLES