HomeUncategorizedआता शहराला दररोज मिळणार 4 कोटी 75 लाख लिटर पाणी..!

आता शहराला दररोज मिळणार 4 कोटी 75 लाख लिटर पाणी..!

बीड : अमृत अटल योजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून काही दिवसांपूर्वी या पाईपलाईनची यशस्वी टेस्टिंग देखील घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष या पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नाळवंडी नाका परिसरात असणार्‍या जलकुंभ येथे अमृत अटल योजनेचे 10 एमएलडी(मिलियन लिटर प्रति दिवस) पाणी उपलब्ध होणार आहे. सदरील पाणी जलकुंभात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी सहकार्‍यांसमवेत भेट देत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली व आढावा घेतला. अमृत अटल योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा सतत पाठपुरावा होता. या योजनेकडे मी स्वतः जाणीवपूर्वक जातीने लक्ष घालून होतो. शहरवासियांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ कसा मिळेल व पाण्याचे अंतर कसे कमी करता येईल यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो व आहे. अमृत अटल योजनेअंतर्गत बीड शहराला एकूण 25 एमएलडी पैकी 10 एमएलडी पाणी पुरवठा शहराला केला जाणार आहे. उर्वरित 15 एमएलडी महावितरणमुळे प्रलंबित आहे. ते सुद्धा लवकरच येईल. अगोदरचे 32 व आताचे 10 मिळून एकूण 42 एमएलडी म्हणजेच 4 कोटी 75 लाख लिटर पाणी शहरवासीयांना आता मिळणार असून यामुळे हद्दवाढ झालेल्या व नवीन समाविष्ट झालेल्या भागात पाणी टंचाई, पाण्याची अनियमितता या नवीन होणार्‍या पाणी पुरवठ्यामुळे मिटणार आहे. उर्वरीत राहिलेल्या टाक्यांचे काम देखील लवकर पूर्ण होणार असून यामुळे शहरवासियांना कमी दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा होणार आहे असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी समवेत राजेंद्र राऊत, सादेक जमा, फारुख पटेल, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ, प्रेम चांदणे, राणा चौहान, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, गणेश तांदळे, रंजित बनसोडे, शुभम धुत, मुन्ना इनामदार, माजी नगरसेवक अमोल पौळ, आरेफ खान, जिलानी बागवान, सौ.संगीताताई वाघमारे, विकास यादव, बंडू निसर्गध, ईश्वर धन्वे, असरार शेख, नबील जमा, अमर विद्यागर, ऋषभ वाघमारे, फामजी पारीख, राहुल शिंदे, विक्रम चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, न.प.कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments