HomeUncategorizedरमाईंचा त्याग युगानुयुगे महिलांना प्रोत्साहन देत राहील- डॉ.सारिका क्षीरसागर..!

रमाईंचा त्याग युगानुयुगे महिलांना प्रोत्साहन देत राहील- डॉ.सारिका क्षीरसागर..!

बीड : युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्याच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.बाबासाहेबांना रमाईची साथ नसती तर कदाचित भिवाचे भीमराव झाले नसते. स्त्री ही सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता ही आहे. असे प्रतिपादन डॉ. सारिका क्षीरसागर यांनी काल सायंकाळी बीड शहरातील पंचशीलनगर येथे नगरसेविका सौ.पुजा गणेश वाघमारे यांच्या वतीने नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या ‘मी रमाई’ या चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मी रमाई हा नव्याने प्रदर्शित झालेला चिञपट काल बीड शहरातील पंचशीलनगर येथे नगरसेविका सौ.पुजा गणेश वाघमारे यांच्या वतीने नागरिकांना दाखवण्यात आला. याप्रसंगी डॉ.सारिका क्षीरसागर यांनी उपस्थित राहुन नागरिकांशी संवाद साधला व चिञपट पाहिला. माता रमाई यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगप्रसिद्ध पुरुष बनविण्यासाठी घेतलेली मेहनत, अत्यंत गरीबीतही रमाबाईंनी समाधान व संयमाने घर सांभाळले आणि प्रत्येक अडचणीत बाबासाहेबांच्या धैर्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या जीवनातील असे बरेचसे महत्त्वाचे प्रसंग बालपणापासुनचे या चिञपटात दाखवण्यात आले असुन,यामुळे माता रमाई या आणखी विस्तृत स्वरुपात कळण्यास आपल्याला मदत होईल. याप्रसंगी या चिञपटाच्या अभिनेञी प्रियंका उबाळे या आवर्जून उपस्थित होत्या तसेच मंगिता वडमारे, लोखंडेताई, सुशिला वडमारे, मंगल वंजारे, लक्ष्मी लोखंडे, लता जाधव, सुरेखा मगर, रुषभ वाघमारे, विकास डोंगरे, प्रेम कांबळे, स्वप्निल वडमारे यांच्यासह परिसरातील महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments