केज-अंबाजोगाई रस्त्यावर भाटुंबा पाटीजवळ अपघात
केज : अंबाजोगाई रोडवर भाटुंबा पाटीजवळ कार व मोटार सायकलची जोरदार धडक होऊन घडलेल्या अपघातात मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावर चंदनसावरगाव जवळ भाटुंबा फाट्यावर आज काही वेळापूर्वी घडली आहे.जखमीला रुग्णवाहीका १०८ ने दवाखान्यात दाखल करण्यात आले.रस्ते चांगले झाले परंतू रुंदी दोन पदरी असल्याने अपघाताच्या घटना सतत घडत आहेत.कालच कुंबेफळ येथे कंटेनर विद्युत रोहित्रावर जाऊन धडकून दोन जण जखमी झाले आहेत.आज ही याच रस्त्यावर भाटुंबा फाट्याजवळ वेगाने येणारी कार आणी स्प्लेंडर मोटार सायकलचा अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला. तसेच मोटार सायकलचे मोठे नुकसान झालं आहे. जखमी केज तालुक्यातील जवळबन येथील असल्याचे सांगितले जात आहे. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थितांनी रुग्णवाहीका १०८ ला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून घेऊन जखमीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत केली. केज – अंबाजोगाई रोडवर अपघाताचे सञ थांबताना दिसुन येत नाही .