केज : येथून कळंबकडे जात असलेल्या वाळुच्या तीन ट्रक केज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.शंकर वाघमोडे यांनी दबंग कामगिरी करीत ताब्यात घेतल्या.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, केज येथून वाळूच्या ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सापळा रचून एक ट्रक उमरी फाट्या जवळ तर दोन ट्रक कळंब रोड वरून ताब्यात घेतल्या.त्या बाबत ट्रक ड्रायव्हर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या वाळू वाहतुकीच्या परवान्याचा मार्ग आणी प्रत्यक्षात वाहनाचा मार्ग यात तफावत आढळून आली. तसेच परवान्या वरील बार कोड हे स्कॅन केले असता त्यातही तफावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.अधिक चौकशीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी एम एच-४३/यु- ८२९९, एम एच-०४/बी जी- ४७३६, एम एच-१२/एआर-४१४१ हे तीन ट्रक पोलीस ठाण्यात आणले असून त्याची अधिक चौकशी करीत असल्याची माहिती मिळते आहे.या घटनेने वाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत .
