HomeUncategorizedकंटेनरची डीपीला जोरदार धडक चालकासह क्लीनर गंभीर जखमी..!

कंटेनरची डीपीला जोरदार धडक चालकासह क्लीनर गंभीर जखमी..!

केज : केज हुन अंबाजोगाईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रला कंटनेरची जोराची धडक बसली. या अपघातात चालक आणि क्लिनर दोघे जखमी झाले असून रोहित्र सेट पूर्ण निकामी होऊन पोल ही वाकडे झाल्याने महावितरणचे ३लाख रुपयांचे नुकसान झाले. हा अपघात कुंबेफळ ता. केज येथे बुधवारी दि.१८ दुपारी २-०० वाजता झाला.केजकडून कंटनेर क्रमांक टी.एस.१२ यु डी १२९३ अंबाजोगाईकडे बुधवारी दुपारी निघाला होता.केज – अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळहुन पुढे गेल्यानंतर कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटनेर हा कुंबेफळ शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफार्मरला जाऊन धडकला. या अपघातात कंटनेरचा चालक व क्लिनर दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ट्रान्सफार्मरला जोराची धडक बसल्याने ट्रान्सफार्मरचे तुकडे तुकडे होऊन लोखंडी पोल ही मोडले आहेत.यामध्ये विद्युत महावितरण कंपनीचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू असल्याने जीवित हानी झाली नाही. महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ अशोक विष्णू वैरागे रा.आनंदगाव ता.केज यांच्या फिर्यादीवरुन कंटनेर चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार श्री. रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.दरम्यान,केजहून पुढे गेल्यानंतर कंटनेर चालकाने क्लिनरला वाहन चालविण्यास दिल्याने हा अपघात झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांमध्ये होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments