HomeUncategorizedराज्यातील पहिले बेघर महिला निवारा केंद्र बीडमध्ये..!

राज्यातील पहिले बेघर महिला निवारा केंद्र बीडमध्ये..!

नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश:1 कोटी 44 लाखास मंजुरी

बीड : नगरपरिषद संचालनालय तथा राज्य अभियान संचालक दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उप अभियान योजना यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना बेघर निवारा बांधकामासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते यामध्ये नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बीडमध्ये बेघर महिलांसाठी निवारा ग्रहाची मागणी करून प्रस्ताव दाखल केला होता या मागणीला यश आले असून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 कोटी 44 लाख 30 हजार 168 इतका निधी मंजूर केला असून आज 57 लाख 72 हजार 67 इतका निधी पहिला हप्ता वितरित केला असून राज्यात पहिले बेघर महिला निवारा गृह हे बीडमध्ये होत आहेबीड शहरात महिलांसाठी निवारा केंद्र असावे असा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी शासनाकडे दाखल केला होता नागरी बेघरांना निवारा बांधकाम प्रस्तावास मंजुरी देण्याची योजना शासनाने लागू केली होती प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून अशा प्रकारचे आदेश आज दिनांक 18 मे रोजी प्राप्त झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निवारा गृहासाठी 1 कोटी 44 लाख 30 हजार 168 इतका निधी मंजूर केला असून पहिला हप्ता म्हणून 57 लाख 72 हजार 67 रुपये वितरित करण्याचे आदेश दिले आहेत,बीड शहरात वार्ड क्रमांक 8 मध्ये दैनिक पार्श्वभूमी कार्यालयाच्या पाठीमागे नवी भाजी मंडई बीड येथे उभारण्यात येणार आहे याठिकाणी 80 बेघरांची निवारा क्षमता असून या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत महिलांसाठी शौचालय प्रथमोपचार खोली समुपदेशन ग्रह, बालसंगोपन केंद्र साठी राखीव जागा तर स्नानगृह, कार्यालय आदि व्यवस्था करण्यात येणार आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद प्रशासन संचालनालय याचे रोहिदास दोरकुळकर उपायुक्त यांनी हे आदेश नुकतेच जारी केले आहे होत असलेल्या राज्यातील पहिल्या महिला बेघर निवारा गुहामुळे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments