आष्टी : 30मार्चपूर्वी पिक कर्ज नूतनीकरण केले तर व्याज परतावा मिळतो त्यामुळे शेतकर्यांनी 30मार्चपूर्वी कर्ज रक्कम जमा करत भरणा केली .सध्या शेतकरी ऊस व कांदा दोन्ही पिकांत मेटाकुटीला आला आहे . शेतकर्यांनी कर्ज नूतनीकरण केले तर दोन दिवसांत नवीन कर्ज परत मिळते व व्याज परतावा ही मिळेल या आशेने 30,मार्च पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंम्पळा मध्ये शेतकर्यांनी कर्ज भरणा केला व रितसर कागदपत्रे जमा करून नवीन कर्ज मागणी अर्जावर टिकिट लावून सह्या करून शाखेत दिले परंतु शेतकऱ्यांना अद्यापही मे महीना संपत आला तरी नवीन कर्ज देण्यात आले नाही . शेतकर्यांनी हात उसने व खाजगी सावकाराकडून दोन दिवसांची मुदतीवर पैसे घेऊन भरणा केला आहे. शाखाधिकारी कर्ज नूतनीकरण करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.कर्ज वितरणासाठी जाणुनबुजून दीरंगाई होत आहे त्यामुळे शाखेत पूर्वीसारखी लाचखोरी व वशीलेबाजी होऊ शकते . शाखाधिकारी हे नूतनीकरण न केलेल्या शेतकर्यांना लेखी नोटीस देऊन पिककर्ज नूतनीकरण करा म्हणून नोटीस बजावण्यात मग्ण आहेत व ज्यांनी स्वतः होऊन पिक कर्ज नूतनीकरण केले आहे त्यांना मात्र बॅंकेत हेलपाटे मारायला लागतात. नूतनीकरणासाठी दिरंगाई करणार्या शाखाधिकारी यांची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी व शाखाधिकारी यांच्या पगारीतून शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या रकमेचे विलंब झालेल्या दिवसांचे व्याज देण्यात यावे . शेतकर्यांची पिळवणूक करूंन बीड जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी जबाबदार ठरू शकणार्या संबंधीत शाखाधिकारी यांची चौकशी होऊन कार्यवाही करावी .बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज पूरवठा सूरळीतपणे करावाअशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी जिल्हाधिकारी बीड व मूख्य व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक मूख्य कार्यालय औरंगाबाद यांच्या कडेला रजिस्टर पोस्टाने पाठवले आहे.
टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारीतून शेतकऱ्यांना विलंब रक्कमेचे व्याज द्या ; शेख अजिमोद्दीन..!
RELATED ARTICLES